भीषण अपघातात ‘kia celtos’कारचे दोन तुकडे, तीन महिलांचा मृत्यू
मृत महिला कळमेश्वर शहरातील रहिवासी
ठळक मुद्देहा भीषण अपघात नागपूर-छिंदवाडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४७ वरील सौंसर (जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश) जवळ शुक्रवारी (दि. ११) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडला.
नागपूर : दुचाकीचालकास वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा वेगात असलेल्या कारवरील ताबा सुटला आणि कार छोट्या पुलाच्या सुरक्षा भिंतीवर आदळली. यात कारचे अक्षरश: दोन तुकडे झाले असून, कारमधील तीन महिलांचा मृत्यू झाला तर कारचालक व एक महिला गंभीर जखमी झाली.
मृतांमधील एक महिला कळमेश्वर शहरातील रहिवासी आहे. हा भीषण अपघातनागपूर-छिंदवाडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४७ वरील सौंसर (जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश) जवळ शुक्रवारी (दि. ११) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडला. मृतांमध्ये प्रिया सचिन जयस्वाल (३२, रा. कळमेश्वर), रोशनी अनूप जयस्वाल (३०) व माधुरी अंगद जयस्वाल (३६) दोघीही रा. सौसर, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश या तिघींचा समावेश असून, संचित प्रेम जयस्वाल व नीलम संचित जयस्वाल (३२) दाेघेही रा. नागपूर अशी जखमींची नावे आहेत. जयस्वाल यांच्या नातेवाईकाने रामाकाेना (मध्य प्रदेश) येथे शुक्रवारी रात्री लग्न असल्याने हे सर्व जण लग्नात सहभागी हाेण्यासाठी गेले होते.