दिशा पटानीने केले बोल्ड फोटोशूट…

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीने अभिनयाची सुरुवात तेलगू (लोफर) चित्रपटापासून केली. (एम. एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी) मधून तिने बॉलीवूडमध्ये देब्यू केलं आणि आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावलं. दिशा पटानी सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव असते व ती तिचे बोल्ड फोटो नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते. दिशा अनेकदा तिचे बिकीनीवरचे फोटो शेअर करते आणि हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडतात. नुकतेच दिशानं तिचे बिकिनीवरचे काही फोटो शेअर केले आहे.

तिनं समुद्रात बिकीनी परिधान करुन मस्ती करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. दिशाचा हा फोटो काही तासात लाखो लोकांना आवडला आहे. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्यांनी दिशाच्या फोटोवर लाईक व कमेंट केली आहे.

दिशा पटानी काही दिवसांपूर्वी तिचा मित्र टायगर श्रॉफसोबत सुट्टी साजरी करण्यासाठी मालदीवमध्ये गेली होती. तिनं बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

दिशा पटानी सलमान खानसोबत राधे चित्रपटात दिसली होती. ईदच्या निमित्ताने हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील दिशाच्या अभिनयाला बरीच पसंती मिळाली.

Print Friendly, PDF & Email
Share