धक्कादायक : वीज पडून 1 गाय व 1 बैल ठार

?पुन्हा शेतकऱ्यावर निसर्ग कोपला.
?देवरी तालुक्यातील भोयारीटोला येथील घटना

देवरी 8: मान्सून ची सुरुवात होताच देवरी तालुक्यात वज्रघाताने शेतकऱ्याच्या गाय व बैलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. प्राप्त माहिती नुसार तालुक्यात आज (८)सायंकाळी ४ वाजता हेमचंद सदाराम मेळेकर मु. भोयरटोला / टेकाबेदर यांच्या घरासमोरील झाडावर वीज पडून 1गाय व 1बैल ठार झाले आहे. सदर घटनेमुळे शेतकऱ्यांसमोर दुःखाचे डोंगर उभे झाले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share