आज देवरी नगरपंचायत वर धड़क मोर्चा

LOGO

घरकुल लाभर्थ्यांच्या विविध समस्येला धरून कांग्रेस पक्षाकड़ून मोर्चाचे आयोजन

डॉ. सुजित टेटे

देवरी 2: केंद्र सरकार कडून देवरी शहरातील घरकुलाचे पात्र लाभर्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात देवरी तालुका कांग्रेस व शहर कांग्रेस कमेटीच्या वतीने आमदार सहषरामभाऊ कोरोटे यांच्या नेतृत्वात देवरीच्या नगरपंचायतीवर धड़क मोर्चाचे आयोजन सोमवार (ता.2 नोव्हेम्बर) रोजी सकाड़ी 11 वाजता देवरी येथील पटाच्या दानीवरून देवरी नगरपंचायत कार्यालयावर धडकनार आहे.
हा मोर्चा देवरी शहरातील गरीब व गरजु लोकांना मंजूर घरकुलाची उर्वरित निधि त्वरित वाटप करण्यात यावे आणी देवरी शहरातील घरकुलाचे पात्र लाभर्थ्यांना शासनाकड़ून त्वरित जमिनीचे पट्टे देण्याची कारवाई करुण या समस्येचे तातडीने निराकरण करण्याच्या मागणीला धरून देवरी तालुका कांग्रेस व शहर कांग्रेस कमेटी तर्फे आमदार सहषरामभाऊ कोरोटे यांच्या नेतृत्वात देवरी च्या नगरपंचायत कार्यालयावर मोर्चा धडकनार आहे.
तरी या मोर्च्यात देवरी शहरातील घरकुलाचे पात्र लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येत सहभाग घेवून सदर मोर्चा यशस्वी करावे असे आव्हान. देवरी तालुका कांग्रेस, शहर कांग्रेस,महिला कांग्रेस,युवक कांग्रेस, व एन.एस.यू.आय.कमेटी च्या वतीने करण्यात आले आहे.#

Share