अवैद्यरित्या विदेशी दारू विकणाऱ्या रेशीम लॉज च्या मालकावर धडक कारवाई

1415/- ची विदेशी दारू जप्त

देवरी 21: पोलीस अधीक्षक गोंदिया विश्व पानसरे यांच्या आदेशान्वये तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध रित्या विदेशी दारू विकणार्यावर आळा घालण्यासाठी पोलीस स्टेशन देवरी अंतर्गत 20/5/2021 रोजी खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात आली.

दि. 20 मे रोजी ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे पोलीस स्टेशन देवरी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे देवरी येथील रेशीम लॉज व हॉटेलचे मालक नाव ज्योतिबा धनीराम धर्मसहारे हा आपल्या हॉटेल मध्ये अवैद्य रित्या विदेशी दारू बाळगून विक्री करीत आहे अशी माहिती मिळाल्याने ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांनी पोलीस स्टाफसह हॉटेल मध्ये रेड घातली असता पंच समक्ष त्याच्या ताब्यात 1) ओसी ब्लू दारू 2 नग 180 ml नी भरलेले किंमत 280 रु. 2) ओसी ब्लू दारूचे 4 नग 90 ml नी भरलेले किंमत 300 रु. 3) इंपिरियल ब्लू दारू 1 नग 180 ml नी भरलेला किंमत 140 रु. 4) इंपिरियल ब्लु दारू 90ml किंमत 75 रु 5) रॉयल स्टॅग दारू 3 नग 90 ml किंमत 260 रु 6) बी7 दारूचे 4 नग 90 ml किंमत 360 रु असा एकूण 1415/- चा माल विना पास परवाना अवैद्यरित्या मिळून आल्याने आरोपी ज्योतिबा धर्मसहारे वय 47 वर्ष रा देवरी यांच्या वर अपराध क्र 126/2021 कलम 65 इ , 77अ मदाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही मध्ये 1415/- ची विदेशी दारू जप्त केली असून यामध्ये ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे पो स्टे देवरी , पोलीस स्टाफ , पो शि नेवारे , चापोह. कानपुरीया यांनी केली

Share