शोमधून बाहेर झालेला हा दुसरा कंटेस्टेंट सुद्धा ‘बिग बॉस’चा एक्स कंटेस्टेंट होता.

कलर्स टीव्हीचा सगळ्यात लोकप्रिय शो असलेला ‘खतरों के खिलाडी’चा सिझन 11 सध्या बराच चर्चेत आलाय. टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील अनेक मोठे कलाकार या शोमध्ये सहभागी होण्यासाठी केपटाउनमध्ये येऊन पोहोचले आहेत. केपटाउनमध्ये या शोसाठीची शूटिंग सुरू आहे. काही दिवसांपुर्वीच शोच्या पहिल्या एलिमिनेशनमध्ये ‘बिग बॉस’ एक्स कंटेस्टेंट विशाल आदित्य सिंह बाहेर झालाय. त्यानंतर आणखी एक कंटेस्टेंट या शोमधून आऊट झाला असल्याची माहिती मिळतेय. शोमधून बाहेर झालेला हा दुसरा कंटेस्टेंट सुद्धा ‘बिग बॉस’चा एक्स कंटेस्टेंट होता.

बॉलिवूड गायिका आस्था गिलने नुकतंच ‘खतरों के खिलाडी 11’ च्या सेटवरून एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये ती वरूण सूदसोबत दिसून आलीय. आस्थाच्या या फोटोवर ‘बिग बॉस 14’ मधील एक्स कंटेस्टेंट निक्की तंबोळीने जी कमेंट केली आहे, त्यावरून विशाल आदित्य सिंहनंतर ती ‘खतरों के खिलाडी 11’ मधून आऊट झाली असल्याचा अंदाज बांधला जातोय. आस्थाच्या फोटोवर कमेंट करत निक्कीने लिहिलंय, “तुमच्यासोबत पुन्हा मस्ती करण्यासाठी आणखी वाट नाही पाहू शकत मित्रांनो…खूप मिस करते तुम्हाला…!”.

Share