पोटेगाव जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमक , ८ नक्षलांचा खात्मा

पोटेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गडचिरोली धानोरा तालुक्याचा सीमावर्ती भागातील भेंडीकनार गावाच्या जंगल परिसरात आज सकाळ च्या सुमारास पोलीस नक्षल चकमक उडाली यात ८ नक्षलांच्या खात्मा झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे .
सविस्तर वृत्त असे कि गडचिरोली पोलिस दलाचे सी ६० जवान गडचिरोली धानोरा तालुक्याचा सीमावर्ती भागातील भेंडीकनार गावाच्या जंगल परिसरात नक्षल विरोधी अभियान राबवित असताना धबा धरून बसून असलेल्या नक्षल्यांनी सी ६० जवानांवर अंधांधुंध गोळीबार केले . यास प्रत्युत्तर देत पोलीस जवानांनी गोळीबार सुरु केला असता पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलांनी तिथून पळ काढला . यानंतर परिसरात शोध मोहीम राबविले असता ८ नक्षलांचा मृतदेह आढळुन आले आहेत . सी ६० जवानांकडून आतापण शोध मोहीम सुरु असून मृत नक्षलांची संख्या वाढण्याची शक्यता आहे . सविस्तर वृत्त थोड्याच वेळात प्रकाशित करण्यात येईल .

Print Friendly, PDF & Email
Share