गडचिरोली : जिल्ह्यात नेहमीच नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना पोलीस-नक्षलांची चकमक घडून येते. अशीच घटना आज दि.१३ में रोजी सकाळच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी धानोरा अंतर्गत पोलीस मदत केंद्र सावरगाव पोलीस मदत केंद्र येथील मोरचूल-बोधनखेडा परिसरात सी ६० पोलीस जवान आणि नक्षलांची जोरदार चकमक घडून आली आहे. प्राप्त माहितीनुसार या चकमकीत दोन नक्षल ठार झाले असून पोलिसांचा जोरदार प्रतिउत्तर बघता नक्षल घनदाट जंगलात पळ काढला असलेल्याचेही माहिती मिळाली आहे.