?सावधान : दोन दिवस देवरी शहरात पाणी पुरवठा नाही….

देवरी 10: देवरी शहरात येणारे दोन दिवस पाणीपुरवठा खंडित राहणार असल्याचे पत्रक नुकतेच नगरपंचायत देवरी द्वारा काढण्यात आले असून शहरातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात आले आहे कि दोन दिवसाच्या पाण्याचा साठा आपल्या कडे करून ठेवावा जेणे करून पाण्याची समस्या निर्माण होणार नाही.

शिरपूर धरणाच्या पाण्याची पातळी कमी झाली असून येणाऱ्या काळात दररोज सारखा पाणी पुरवठा करता येणार नाही. नागरिकांनी पाण्याचा दुरुपयोग करू नये आणि पाण्याची बचत करावी असे पत्रात नमूद करण्यात आलेले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share