२३ मे ला होणारी इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा तूर्तास स्थगित
गोंदिया 10: महाराष्ट्र परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दिनांक २३ मे, २०२१ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली होती.
परंतु राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी हितास प्राधान्य देऊन सदर परीक्षा तूर्त पुढे ढकलण्यात येत आहे. परीक्षेची पुढील तारीख यथावकाश कळविण्यात येईल. असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याद्वारे परिपत्रक जाहीर करून कळविण्यात आले आहे.
उपरोक्तनुसार झालेल्या बदलाची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे आवाहन शिक्षणाधिकारी(माध्य) प्रफुल कचवे, शिक्षणाधिकारी(प्राथ.) राजकुमार हिवारे व गट शिक्षणाधिकारी एम.एल.मेश्राम यांनी केले आहे.