पोलीस-नक्षल चकमकीत दोन पुरुष नक्षल ठार; C-६० जवानांची मोठी कारवाई
जंबिया गट्टा परिसरात झाली चकमक; विनय वर २ लाखाचे बक्षीस तर मनोहर वर ६ लाखाचे होते बक्षीस
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जांबिया गटाच्या जंगलात सी सिक्स्टी (सी-६०) कमांडो पथकाकडून राबविण्यात येणाऱ्या अभियानाला यश प्राप्त झाले आहे. आज सकाळी झालेल्या चकमकीत दोन माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांच्या जवानांना यश मिळाले आहे. या चकमकीत ठार झालेल्या १) विनय लालू नरोटे वय २१ वर्ष रा. झारेवाडा तह. एटापल्ली यांचेवर १६ गुन्हे दाखल होते तर २) विवेक उर्फ सुरज उर्फ मनोहर कानू नरोटे रा. झाडाटॊला तह. धानोरा यांचेवर १८ गुन्हे दाखल होते.
घटनास्थळी दोन पुरुष माओवाद्यांचे मृतदेह आढळले असून काही शस्त्रही सापडली आहेत त्यानंतर या भागात शोध मोहीम राबवण्यात आली दुपारी हेलिकॉप्टरने हे मृतदेह गडचिरोली काढण्यात आले आहे.