आयपीएस अतुल कुलकर्णी यांना निरोप
देवरी 27- गोंदिया जिल्हातील देवरी येथील पोलिस उपमुख्यालयात कार्यरत असलेले अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे स्थानांतरण चंद्रपुर येथे झाल्याने त्यांना देवरी याथिल सुशिक्षित बेररोजगारांनी त्यांच्या कार्यालयात भेटून एक झाड व पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला.
सविस्तर वृत्त असे की देवरी येथे अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी देवरी शहरासह तालुक्यातील अनेक होतकरू सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या मनात एक वेगळी वळण लावून त्यांना आपले उज्जवल भविष्य घडविण्याकरिता वेळोवेळी अमूल्य मार्गदर्शन केले त्यांच्या प्रेरणेने प्रभावित होऊन अनेक युवकांनी आपल्या जीवनातील ध्येय धोरणे निश्चित केले.
अश्या देवरी शहरातील युवकांनी अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची भेट घेऊन त्यांना एक झाड व पुष्पगुच्छ देवून निरोप दिला. यावेळी हिमांशु शर्मा , मोहित रामटेके, निखिल गेडाम , प्रशांत सलामे , राहुल मेश्राम , अजय मरस्कोल्हे यांच्या सह अनेक युवकांचा समावेश होता.