आज तालुका काँग्रेस कमिटी तर्फे जि .प . च्या विश्रामगृहात रक्तदान शिबीर सुरु

20 एप्रिल 2021 रोज मंगळवार वेळ :सकाळी 11:00 ते 02.00वाजेपर्यंत

स्थळ : पंचायत समितीच्या बाजूला जि . प. विश्राम गृह देवरी


देवरी 20: आमदार नानाभाऊ पटोले प्रांताध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या आव्हानानुसार राज्यात कोरोनासदृश्य काळात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर रक्तदान करण्याचे आव्हान करण्यात आले आहेत.

त्या अनुषंगाने तालुका काँग्रेस कमिटी,महिला काँग्रेस कमिटी,किसान कांग्रेस, युवक काँग्रेस,NSUI,असंघटित कामगार संघटना,ओबीसी व अनुसूचित जाती विभागातील सर्व पदाधिकाऱ्यांना सुचित करण्यात येते की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करावे व सोबतच दुसऱ्यांना सुद्धा रक्तदान करण्याकरिता जास्तीत जास्त संख्येने प्रेरित करावे, असे आव्हान तालुका अध्यक्ष संदीप भाटिया यांनी केले आहे.


महत्त्वाचे की,रक्तदान करणाऱ्या व्यक्तींच्या नावाने कार्ड मिळणार असून सदर कार्डावर दोन वर्षा पर्यंत कोणालाही आपत्तिजनक परिस्थीत मोफत रक्त मिळणार.

Share