शैक्षणिक साहित्य वाटप करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी


देवरी 14: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 130 वी जयंती भदन्त राहुल बुद्ध विहार परसोला, डेपो येथे साजरी करण्यात आली.


इंजी. प्रीती नेताम (भांडारकर) यांनी भगवान गौतम बुद्धाच्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.
तसेच याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना समोर नेत इंजी. प्रीती नेताम (भांडारकर), संध्याताई गाढवे- समाजसेविका प्रभाग क्रमांक २ व मिराबाई भोजराज पदमे यांनी लहान मुलामुलींना शैक्षणिक साहित्य वाटप केले.

Print Friendly, PDF & Email
Share