सर्वांनी डॉ. बाबासाहेबांचे विचार आत्मसात करावे-आमदार सहषराम कोरोटे

मुलगंध कुटी बौद्ध विहारात डॉ. बाबासाहेब यांच्या जयंती निमित्य पुतळ्याला माल्यार्पण व अभिवादन

देवरी १४: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 130 व्या जयंती निमित्त आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी देवरी च्या मुलगंध कुटी बौद्ध विहारात अभिवादन केले .

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण जगाला व आपल्या देशाला अमूल्य विचारांनी जागृत केले आहे अशा विचारांना सर्वांनी आत्मसात करावे असे प्रतिपादन आमदार सहषराम कोरोटे यांनी केले. देवरी येथील मुलगंध कुटी बौद्ध विहारात बुधवार( ता.१४ एप्रिल) रोजी डॉ. बाबासाहेब आम्बेडकर यांच्या जयंती निमित्य आयोजीत पुतळ्याला मालार्पण व अभिवादन कार्यक्रमात त्यांनी संबोधित केले .


याप्रसंगी, रूपचंद जांभुळकर, प्रशांत कोटांगले, अमित तरजुले, मधुकर साखरे, नरेश राऊत यांच्या सह बौद्ध समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share