गोंदिया पोलिस दलातर्फे भव्य रोजगार मेळावा संपन्न

पोलिस विभागाद्वारे सुशिक्षित तरुण तरुणीसाठी रोजगाराच्या संधी 1182 बेरोजगार तरूणांनी घेतला भाग

डॉ. सुजित टेटे

देवरी 21- गोंदिया जिल्हा पोलिस दलाच्या सौजण्याने सुशिक्षित तरुण तरुणीसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन दि – 16 ते 18 फेब्रुवारी 2021 ला करण्यात आले असून सदर रोजगार मेळाव्यात यशस्वी ग्रुप पुणे, पटेल एज्युकेशन स्किल ग्रुप नागपूर, एमर्ज वर्क फोर्स इत्यादी कंपन्या मुलाखती साठी आलेले होते. त्यामधे 1182 बेरोजगार तरूणांनी भाग घेतला.

विशेष म्हणजे गोंदिया जिल्हातील नक्षलग्रस्त भागतील तरुण तरुणी आणि इतर नागरिकांनी नक्षलवादयाच्या भुलपाथाना बळी न पडता या रोजगार संधीचा फडा घेऊन आपले जीवन चांगले जगावे व शहसनच्या मुखी प्रवाहात सामील व्हावे असे आवाहन पोलिस अधीक्षक विश्व पानसरे आणि अतुल कुलकर्णी अप्पर पोलिस अधिक्षक देवरी यांनी केलेले आहे.

सदर रोजगार मेळाव्याला नक्षल सेल गोंदिया/ देवरी, पो. स्टे. देवरी, नवेगाव बांध, सालेकसा चे अधिकारी आणि कर्मचारी यांनी अथक परिश्रम केला.

Print Friendly, PDF & Email
Share