शेडेपार शाळेला केंद्रस्तरीय क्रीडा सन्मान, ६ पुरस्कारांसह ‘उत्कृष्ट खेळाडूवृत्ती’चा एकमेव मान

Deori : अटल क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये शेडेपार येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेने भक्कम तयारी, संघभावना आणि उत्तुंग क्रीडादृष्टीच्या जोरावर एकूण ६ पुरस्कार मिळवत यशाचा नवा अध्याय रचला. यातील विशेष ठरला तो ‘उत्कृष्ट खेळाडूवृत्ती जोपासणारा एकमेव पुरस्कार’, जो संपूर्ण स्पर्धेत फक्त शेडेपार शाळेलाच प्रदान करण्यात आला.

स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी दाखवलेली शिस्त, नम्रता, टीमवर्क, नियमांचे पालन व सकारात्मक खेळभावना यांचे सर्व स्तरांवर कौतुक झाले. खेळात जिंकणे-हारणे यापलीकडे जाऊन विद्यार्थ्यांनी दाखवलेली प्रामाणिकता आणि आत्मविश्वास परीक्षकांच्या विशेष नजरेत भरला.या अविस्मरणीय यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, सर्व शिक्षकवर्ग, तसेच पालक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. या सन्मानामुळे शेडेपार गावाने क्रीडा क्षेत्रात स्वतःची नवी ओळख निर्माण केली असून हा क्षण गावासाठी अभिमानास्पद ठरला आहे.
तसेच मुरदोली येथील शिक्षक वृंद व गावावासी यांनी हा पुरस्कार शेडेपार या गावाला दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार
तसेच हा पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल गावकरी मंडळी शाळा व्यवस्थापण समिती, ग्रामपंचायत चे सर्व पदाधिकारी यांनी हा पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल शिक्षकांचे कौतुक केले आहेत.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें