भागी/ शिरपूर येथे मोफत ॲनिमिया तपासणी शिबिर

प्रहार न्यूज नेटवर्क| भुपेन्द्र मस्के
देवरी: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत भागी/ शिरपूर आणि आरोग्य विभाग गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने समाजमंदिर शिरपुर येथे येथे मोफत आरोग्य तपासणी व विशेषतः ॲनिमिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे होते.

ग्रामीण भागातील गरीब व गरजू महिला व किशोरवयीन महिलांकरिता शिबिर घेण्यात आला. यामध्ये ऐकुन ७४ महिलांनी सहभाग घेतला .यावेळी डॉ . मानकर वैद्यकीय अधिकारी घोनाडी, आरोग्य सेवक सोनटक्के, आरोग्य सेविका कविता मेश्राम , आशा वर्कर रंजना कोरोंडे, कलावती भोयर पो.पा. प्रतिभा कोरोंडे, सरपंच पुष्पा राऊत व गावातील महिला बचत गटाच्या सदस्य हे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें