सालेकसा निवडणूक प्रकरणातील अधिकाऱ्यांची बदली नको , निलंबित करा ?

सालेकसा – सालेकसा नगरपंचायतच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका कांबळे यांची याप्रकरणी बदली करण्यात आल्याची माहिती कळताच सालेकसातील भाजप वगळता इतर सर्व राजकीय पक्षांनी एकमत करत सालेकसा तहसील कार्यालयावर गुरुवारी धडक मोर्चा काढला. सालेकसा नगरपंचायतच्या निवडणूक निर्णय अधिकारी आणि या प्रकरणात गुंतलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे बदली नको तर निलंबन हवे, अशी माागणी त्यांनी केली. तसेच या प्रकरणात राज्य निवडणूक आयोगाला चुकीची रिपोर्टिंग केल्याबद्दल उपविभागीय अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन राज्य निवडणूक आयोगाच्या नावे सालेकसा चे तहसीलदार कोंडगुर्ले यांना देण्यात आले.

सालेकसा नगरपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी विरोधात सालेकसा तहसील कार्यालयावर धडकलेल्या या मोर्चातील प्रमुख मागण्यांमध्ये या प्रकरणी दोषींना तात्काळ निलंबित करण्यात यावे. निवडणूक प्रक्रियेच्या आरंभापासून आजपर्यत चे उपविभागीय अधिकारी देवरी तहसिलदार आणि निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका कांबळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद कांबळे यांचे सर्व मोबाईल फोन डाटाचे सीडीआर तपासण्यात यावे. निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका कांबळे आणि प्रमोद कांबळे याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. उपविभागीय अधिकारी देवरी यांनी खोटा अहवाल सादर करुन निर्वाचन आयोगाची दिशाभूल व आदर्श आचार संहितेचा भंग केल्याने यांना ही निलंबित करण्यात यावे. या प्रकरणावरुन कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास याला जवाबदार असणारे दोषी यांच्यावर कार्यवाही न झाल्यास जनक्षोभ आणि इतर बाबींना निर्माण होणाऱ्या परिस्थितीला आपण जवाबदार असणार असल्याचे ही सालेकसा तहसीलदार कोंडागुर्ले यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें