देवरी एचपी गॅस एजन्सीवर नागरिकांचा संताप

१५ दिवसांपासून गॅस सिलेंडरची प्रतीक्षा, गॅस सिलेंडर साठी रांगाच रांगा

देवरी : येथील गॅस एजन्सीकडून गेल्या पंधरा दिवसांपासून गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. घरगुती वापरासाठी अत्यावश्यक असलेल्या गॅस सिलेंडरची वेळेवर उपलब्धता न झाल्याने सर्वसामान्य कुटुंबांचे हाल होत आहेत.

गॅस सिलेंडर बुकिंग केल्यानंतरही अनेक ग्राहकांना अद्याप सिलेंडर मिळालेला नाही. वारंवार एजन्सीकडे चौकशी करूनही ठोस उत्तर मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. काही नागरिकांनी एजन्सीसमोर जाऊन आपली नाराजी व्यक्त केली असून, लवकरात लवकर पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.

विशेषतः गृहिणी, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचे कुटुंब यांना या विलंबाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पर्याय नसल्यामुळे अनेकांना सिलेंडर साठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

दरम्यान, गॅस एजन्सी प्रशासनाने तांत्रिक अडचणी किंवा पुरवठा साखळीतील समस्येमुळे उशीर होत असल्याचे सांगितले असले तरी नागरिकांना यावर समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून सिलेंडरचा पुरवठा सुरळीत कराव अशी महनी नागरिकांनी केली आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें