देवरी: आदिवासी भाग म्हणून परिचीत असलेल्या देवरी तालुक्यातील घनदाट जंगलातील परसोडी गावालगत असलेल्या धुकेश्वरी मंदीराला लागून असलेल्या तालुक्यातील एकमेव असलेल्या श्री संतोषी माता मंदीरात शारदीय नवरात्री उत्सव मोठ्या थाटात व उत्साहात साजरा करण्यात आला.
देवरी येथील गोडसेलवार कुटूंबातील अँड.रूपाली दिनेश गोडसेलवार दाम्पत्यांनी या काही वर्षापूर्वी या मंदीराचे बांधकाम व श्री संतोषी माता मूर्तीची प्राणप्रतीष्ठा केली. या ठिकानी आपल्या श्रध्देनुसार या ठिकाणी घटस्थापना करून श्री संतोषी मातेची विधीवत पूजा अर्चना करण्याचे कार्य सुरू आहे.
आता नुकतेच पार पडलेल्या शारदीय नवरात्री उत्सवा निमित्य देवरी तालुक्यातील परसोडी येथे एकमेव असलेल्या श्री संतोषी मातेचे मंदीर या ठिकाणी मोठ्या थाटात व उत्साहात साजरा करण्यात आला. यात नऊ दिवस भजन,व महाप्रसाद वाटप करून अशा विविध प्रकारे श्री संतोषी मातेचे आराधना केली. या सर्व कार्यक्रमाचे परसोडी व परिसरातील शेकडो भावी भक्तांनी लाभ घेतला.
या शारदीय नवरात्री दरम्यान मंदीराचे पुजारी महेद्र पुराम व इतर सेवकांचे फार मोठे सहकार्य लाभले. या आध्यात्मीक कार्याकरीता देवरी तालुक्यातील भावी भक्तांनी गोडसेलवार कुटूंबातील अँड.रूपाली दिनेश गोडसेलवार दाम्पत्यांचे अभिनंदन केले आहे.









