देवरी चेकपोस्ट वर ट्रक ला आग

देवरी :  देवरी शहरातून जाणाऱ्या मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील देवरी तालुक्यातील शिरपूरबांध येथील सीमा तपासणी नाक्याजवळ एका टायर वाहून नेत असलेल्या उभ्या ट्रकला अचानक आग लागली. ज्यामध्ये संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. हि घटना सोमवार २२ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहाणी झाली नसली तरी चालकाला किरकोळ दुखापत झाली असून ट्रक मधील टायर जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले.

देवरी शहरापासून काही अंतरावर मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर सीमा तपासणी नाका असून अनेक ट्रक चालक आपले वाहन या परिसरात उभी करतात. दरम्यान, घटनेच्या वेळी ट्रक चालक कॅबिनमध्ये स्वयंपाक करत असताना गॅस पाईप लिक झाल्याने कॅबिनमध्ये आग लागली. विशेष म्हणजे, ट्रक मध्ये टायर भरले असल्याने क्षणातच आगीने रौद्र रुप धारण केले. ज्यामुळे संपूर्ण ट्रक जळून खाक झाले. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीव हाणी झाली नाही. मात्र, आगीमुळे चालकाला किरकोळ दुखापत झाली. दरम्यान, अग्निश्मन वाहनाला पाचारण करून आग विझविण्यात आली. या घटनेमुळे काही वेळ सीमा तपासणी नाका परिसरात एकच तारांबळ उडाली होती.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें