सालेकसा : सालेकसा शहरासह परिसरात विश्वमंगल्य सदाचार सभा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी विविध ठिकाणी हा महत्वाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
सभेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले आहे –सकाळी ११.०० वा. – आमगाव / खुर्द दुपारी १.०० वा. – शिवमंदिर, सालेकसा दुपारी ३.०० वा. – जुना सालेकसा
या कार्यक्रमाला कु. संगरा चुंबळकर (संगठन मंत्री, विश्वमंगल्य सभा भंडारा व गोंदिया),श्रीलेखा पाटुरकर (धर्म संस्कृती शिक्षण विभाग, विदर्भ प्रांत प्रमुख प्रशिक्षिका)आणि सविता संजय पुराम (विदर्भ प्रांत जनप्रतिनिधी, परिवार संपर्क विभाग) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
बैठकीदरम्यान उपस्थित मान्यवरांनी सदाचार, संस्कार आणि सामाजिक ऐक्य या माध्यमातून समाजातील सकारात्मक बदल घडविण्याची गरज अधोरेखित केली. तसेच अधिकाधिक कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन समाज प्रबोधन घडवून आणावे, असे आवाहनही करण्यात आले.
या भव्य कार्यक्रमाचे आयोजन विश्वमंगल्य सभा, शाखा गोंदिया यांच्या वतीने करण्यात आले असून शालिनी बडोले, मधु अग्रवाल व प्रतिभा परिहार यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.आयोजकांनी सर्व कार्यकर्त्यांना व नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.








