
देवरी : तालुक्यातील केंद्र ककोडी जि.प.व.प्रा.शाळेने मध्ये प्रथम क्रमांक पटकावून गाव, केंद्र व तालुक्याचा मान उंचावला आहे.या यशामध्ये महेंद्र मोटघरे (गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती देवरी),एस. जी. राऊत (केंद्रप्रमुख, केंद्र ककोडी), चेतनदास कुवरदादरा (अध्यक्ष, शा.व्य.समिती, जि.प.व.प्रा.शाळा चिल्हाटी),
तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व मान्यवर सदस्य, सर्व पालकवर्ग, व केंद्रातिल सर्व शिकक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
शाळेच्या वतीने सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले असून, “आपल्या सततच्या प्रेरणा व मार्गदर्शनामुळे शाळा भविष्यातही उत्तरोत्तर प्रगती साधेल व नाविन्यपूर्ण उपक्रमांचे केंद्रबिंदू ठरेल” असा दृढ विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.








