
देवरी : तालुक्यात “अ” क्रॉझ डान्स अकॅडमी तर्फे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त रास-गरबा दांडिया प्रशिक्षण शिबिर २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ६ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०२५ या कालावधीत जि. प. क्रीडा संकुल, चिचगड रोड, देवरी येथे पार पडणार आहे.या शिबिरात महिलांसाठी विशेष सवलत देण्यात आली असून ५०% डिस्काउंट ची आकर्षक ऑफर ठेवण्यात आली आहे. कार्यक्रमाचे विशेष मार्गदर्शन प्रशिक्षक आशीष ठाकरे (शिवम) करतील.
यासोबतच २४ सप्टेंबर २०२५ रोजी भव्य दांडिया-गरबा स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, ती देखील जि. प. क्रीडा संकुल, देवरी येथे होणार आहे.या उपक्रमाचे आयोजन सविता पुराम (माजी सभापती, जि. प. गोंदिया) यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.
☎️ अधिक माहितीसाठी संपर्क:
आशीष ठाकरे (शिवम) – 9021802821 कु. दिव्या मडावी – 9325917358
✨ शारदीय नवरात्र उत्सवाच्या पावन पर्वावर गरबा-दांडियाचा उत्सव रंगणार असून, युवक-युवतींनी व महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.








