डोंगरगाव येथील २८ वर्षीय युवक रेल्वे अपघातात मृत बाम्हणी फाटकानजीक घटना

Deori:  तालुक्यातील डोंगरगाव येथील युवकाचा रेल्वे अपघातात मृत झाल्याची दुर्दैवी अंत झाला. बाह्मणी रेल्वे फाटकाजवळ सकाळी घडलेल्या दुर्घटनेत अंतिम ओमप्रकाश खोटेले (वय २८) याचा रेल्वेखाली सापडून मृत्यू झाला.

या संदर्भात मृतकाचे वडील ओमप्रकाश माधव खोटेले (वय ५३) यांनी आमगाव पोलीस स्टेशनमध्ये तोंडी फिर्याद दिली असून, स्टेशन मास्तर आमगाव यांनी दिलेल्या मेमोवरूनही घटनेची नोंद करण्यात आली आहे.

ही घटना दिनांक २९ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे वाजता डाउन लाईन Km 974/16-10 या ठिकाणी घडली. मृत्यूचे कारण रेल्वेने कपुन मृत्यू असे नमूद करण्यात आले आहे.आमगाव पोलिसांनी प्रकरण नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. नोंद पोना बोपचे यांनी केली असून, तपास पोहवा उईके करीत आहेत.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें