देवरी पोलिसांची तत्परता : घरात शिरलेला अजगर साप केले रेस्क्यू

देवरी (प्रहार टाईम्स ) :देवरी शहरात सध्या अजगर साप दिसण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. आज पुन्हा एकदा सद्दू सय्यद संजय नगर या स्थानिक नागरिकांच्या घरात एक मोठा अजगर शिरल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

https://www.instagram.com/reel/DN9zryoEox5/?igsh=bTVrYWZoZm10ODF6

प्राप्त माहितीनुसार रात्रीच्या सुमारास घटनेची माहिती मिळताच देवरी पोलिस पेट्रोलिंग करतांना तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यामधे पोलीस कर्मचारी विशाल खांडेकर यांनी तत्परता दाखवीत नागरिकांच्या मदतीने व वनविभागाच्या सूचनेनुसार पोलिसांनी अजगराला सुरक्षितपणे पकडून जंगल परिसरात सोडले. त्यांच्या या तत्पर कार्यामुळे नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे देवरी पोलिसांना आभार मानला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात अजगर साप वारंवार दिसत असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. शिकार मिळवण्यासाठी अजगर घरांच्या वस्तीमध्ये शिरत आहेत. नागरिकांनी अशा प्रसंगी घाबरून न जाता तातडीने पोलिस किंवा वनविभागाला संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें