देवरी : येथील ब्लॉसम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींनी उत्तर देवरी आणि दक्षिण देवरीच्या वनविभागाच्या वनरक्षक, वनक्षेत्राधिकारी तसेच अधिकाऱ्यांसोबत राखी बांधून रक्षाबंधन सण आनंदात साजरा केला. शाळेतील मुलींनी आकर्षक राख्या वनअधिकारी व कर्मचाऱ्यांना बांधून भावबंध दृढ करण्याचा सुंदर प्रयत्न केला. यावेळी भेटवस्तू म्हणून वनविभागातर्फे चित्रकला पुस्तके भेट देण्यात आले. सादर कार्यक्रमाचे आयोजन वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. वनविभागातर्फे सुंदर असे नियोजन यावेळी केले होते.
या निमित्ताने विद्यार्थिनींनी पर्यावरण संवर्धन, वन्यजीव संरक्षण आणि वृक्ष लागवडीचे महत्त्व यावर संदेश दिले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मुलींच्या या उपक्रमाचे कौतुक करून निसर्ग रक्षणासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापक डॉ. सुजित टेटे, शिक्षकवर्ग, वनरक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. भावपूर्ण वातावरणात साजरा झालेल्या या उपक्रमातून बंधुभाव, संस्कार आणि पर्यावरणप्रेमाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.









