मनोहरभाई पटेल विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालय देवरी येथे जागतिक आदिवासी दिन साजरा

देवरी: येथील मनोहरभाई पटेल विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य जी.एम. मेश्राम, मुख्याध्यापक व्ही.एस.गेडाम, उपमुख्याध्यापक एस.पी.देशमुख, पर्यवेक्षक डी.एच.ढवळे,बी.एस.चाकाटे,आर.पी.मोहुर्ले,रासेयो प्रमुख -जगदीश खेडकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
सर्व मान्यवरांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या सामाजिक योगदानाबद्दल भरीव विचार व्यक्त केले.बिरसा मुंडा म्हणजे परिवर्तनवादी विचारसरणी असे विचार विद्यार्थांनी व्यक्त केले.
अशा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी मते यांनी केले तर आभार विशाल नागदेवे यांनी मानले व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें