???? 860नागरिकांची नेत्र तपासणी, 600चष्मे वाटप, 150 रुग्णांची नेत्र शस्त्रक्रियेसाठी निवड
देवरी: जे का रंजले गांजले, त्यासी मने जो आपुले, तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, या संत तुकारामांच्या ओळीने आपण प्रभावीत होऊन समाजसेवेचे व्रत हाती घेतले आहे. गेल्या पंधरा वर्षापासून जन्मदिन साजरा करताना समाजाचे काही देणे लागते या गोष्टीची जाणीव ठेवून आपण जन्मदिवस हा सामाजिक उपक्रमातून चालू ठेवला असून ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. असे उद्गार आमगाव विधानसभेचे आ.संजय पुराम यांनी नेत्रतपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन जि . प .अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या हस्ते संघटनमंत्री वीरेंद्र अंजनकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. विशेष अतिथी म्हणून प्रकल्प अधिकारी उमेश काशीद उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि . प.सदस्य कल्पनाताई वालोदे,सभापती पं.स.अनिल बिसेन, सरपंच कल्पनाताई देशमुख, नगराध्यक्ष संजू उईके, यादोराव पंचमवार, सविताताई पुराम,राजेंद्र बडोले,प्रवीण दहिकर आदी उपस्थित होते. आ.संजय पुराम यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मे नेत्रपेढी नेत्र रुग्णालय नागपूर व जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती गोंदिया तसेच संजय पुराम मित्र परिवार तर्फे शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळा बोरगाव च्या प्रांगणात दिनांक 6रोजी आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.पुढे बोलताना पुराम म्हणाले की अंधांना दृष्टी, निराधारांना आधार व रुग्णांना रुग्णसेवा तसेच क्षेत्राचा विकास हेच आपले एकमेव उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष वीरेंद्र अंजनकर यांनी आ.संजय पुराम यांच्या सामाजिक उपक्रमाची स्तुती करताना म्हटले की,आ. पुराम यांच्या द्वारा चालविण्यात येणाऱ्या उपक्रमाचा नागरिकांनी लाभ घेऊन विकास करून घ्यावा.यावेळी सर्व मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रतिभा परिहार यांनी तर उपस्थितांचे आभार विनोद भेंडारकर यांनी मानले.
860 नागरिकांची नेत्र तपासणी,600 जणांना चष्मे वाटप,150रुग्णांची नेत्र शस्त्रक्रियेसाठी निवड. मागील 15 वर्षापासून वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवून नेत्र तपासणी शिबिर निरंतर राबविणारे आमदार संजय पुराम यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारला आयोजित नेत्र तपासणी शिबिरादरम्यान विधानसभा क्षेत्रातील 860 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली.ज्यामध्ये 600 जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.तर 150रुग्णांना नागपूर येथे शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात येणार आहे. तसेच यावेळी शेकडो नागरिकांची रक्त तपासणी करण्यात आली.नेत्र तपासणी व रक्त तपासणी दरम्यान नागरिकांनी समाधान व्यक्त केले. व आमदार संजय पुराम यांचे आभार मानले.









