ब्लॉसम स्कुलच्या चिमुकल्यांचा पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद

रक्षाबंधनच्या पर्वावर संस्मरणीय भेट

देवरी: 25 तालुक्यातील लोकप्रिय ब्लॉसम पब्लिक स्कुलच्या विद्यार्थिनींनी देवरी पोलीस स्टेशनला भेट दिली. सदर उपक्रमाचे आयोजन शाळेचे प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांनी रक्षाबंधनाचा पार्श्वभूमी वर केले. कित्तेक वर्षापासून सदर उपक्रम ब्लॉसम स्कुल पोलीस स्टेशन देवरी येथे राबवत आहे.

विद्यार्थिनीची समाजातील स्थान निर्भीड व्हावे तसेच पोलीस विभागाची सविस्तर माहिती मिळावी या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सदर प्रकल्पाला यशस्वीरूप देण्यासाठी देवरीचे कर्तव्यदक्ष आणि विध्यार्थी प्रेमी पोलीस अधिकारी प्रवीण डांगे आणि इतर अधिकारी यांनी विद्यार्थांशी संवाद साधून रक्षा बंधनाचा सण साजरा केला . पोलीस खाते म्हणजे समाजाचे एक घटक ! चोवीस तास समाजाची सेवा करत असतांना सामान्य नागरिकाप्रमाणे त्यांना आपल्या कुटुंबासोबत सण साजरे करता येत नाही. रक्षाबंधांच्या पर्वावर हि भेट आयोजित केल्यामुळे चिमुकल्या विद्यार्थिनींनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राख्या बांधून स्नेह द्विगुणित केला. या वेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी विद्यार्थिनी दाखविलेल्या स्नेहाने भारावून गेले. विद्यार्थिनींना त्यांच्या सुरक्षेची हमी यावेळी देण्यात आली. या भेटीला मूर्तरूप देण्यासाठी पोलीस कर्मचारी, शिक्षक नितेश लाडे, मनीषा काशीवार, प्रियांका सलामे, सोनिया माटे, आचल भगत , दामिनी कुमोटे आदी शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें