गोंदियात मुसळधार 233 मिमी पावसाची नोंद

गोंदिया: जिल्ह्यात आठही तालुक्यांमध्ये सलग तिसर्‍या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. संततधारेमुळे धरणांतील पाणी पातळीत वाढ होत आहे. धान रोवणीच्या कामाला वेग आला आहे.आज जिल्ह्यात 48.5 मिलीमीटर तर गोंदिया व तिरोडा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली.

रविवारी संध्याकाळपासून पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. गोंदिया व तिरोडा तालुक्यांमध्ये यंदाच्या मोसमातील विक्रमी पाऊस झाला. मागील 24 तासांत गोंदिया तालुक्यात 66.4 तर तिरोडा तालुक्यात 72.9 मिली मीटर पाऊस नोंदला गेला. आमगाव 36, गोरेगाव 39.9, सालेकसा 46.7, देवरी 45, अर्जुनी मोर 41.3, सडक अर्जुनी 25.5 मिमी, असा जिल्हयात सरासरी 48.5 मिमी पाऊस बरसला. यामुळे काही ठिकाणी वाहतुक विस्कळीत झाल्याचे चित्र होते. जिल्ह्यात अनेक भागातील धान नसर्‍यांमध्ये पाणी साचल्याने शेतकर्‍यांनी धान लागवडीच्या कामाला सुरवात केली आहे.

मागील 24 तासांत जिल्हयातील 10 महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. यात गोंदिया तालुक्यातील गंगाझरी 78 मिमी, दासगाव व रावणवाडी 65.5 मिमी, कामठा 79.4 मिमी, कुडवा 93.7 मिमी. तिरोडा तालुक्यातील परसवाडा मंडळात विक्रमी 113.3 मिमी, तिरोडा 99.5 मिमी, ठाणेगाव 67.3 मिमी तर देवरी तालुक्यातील चिचगड मंडळात 97.8 मिमी, ककोडी 67 मिमी पाऊस बरसला.

तालुकानिहाय झालेला पाऊस व टक्केवारी

तालुका पाऊस (मिमीत) टक्केवारी

गोंदिया 274.4 95.5

आमगाव 261.5 74.1

तिरोडा 186.7 65.6

गोरेगाव 240.3 96.7

सालेकसा 217.1 74.1

देवरी 191.8 62.6

अर्जुनी मोर 282.5 82.1

स. अर्जुनी 183.5 51.9

एकूण 233.2 81.4

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें