सालेगांव येथे आढळले बेपत्ता युवकाचे शव, गावामधे अनेक तर्क वितर्क

लोहारा/सुरतोली:- देवरी तालुक्यातील सुब्रायटोला येथील युवक रुतीक सुनील सोनवाने यांच्या मृतदेह सहा दिवसानंतर सालेगाव शिवारातील नाल्यात कुजलेल्या अवस्थेत आढळ्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहे.
सविस्तर वृत असे की, सुब्रायटोला येथील रहीवासी युवक रुतीक सुनील सोनवाने वय वर्षे २२ हा दि.१२ सप्टेंबरच्या पहाटे अंदाजे ४.०० वाजे दरम्यान घरुन बेपत्ता झाल्याची तक्रार त्याचा वडील सुनील सोनवाने वय वर्षे ५० यांनी दि.१३ सप्टेंबरला पोलीस स्टेशन देवरी येथे बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती . प्राप्त माहिती नुसार बेपत्ता युवक हा दि.११ सप्टेंबरला रात्री १२ वाजेदरम्यान विषारी विषारी औषध प्राशन केले होते परंतु त्याच्यावर कोणताही औषधोपचार केले नसल्याचे वृत्त आहे. अखेर सहाव्या दिवसी सालेगाव शिवारातील नाल्यात कुजलेल्या अवस्थेत एक शव दि.१७ सप्टेंबरच्या सायकांळी आढळल्याने खळबळ उडाली. घटनास्थळी पोलीस विभागाचे बोपचे व त्यांचे सहयोगी कर्मचारी दाखल झाले असता कुजलेल्या शवाचे ओळख पटल्यानंतर देवरी पोलीस स्टेशनचे थानेदार प्रवीण डांगे दाखल झाले. पाण्यातुन शव बाहेर काढुन शवविच्छेदनाकरीता देवरीला पाठविण्यात आले आहे.

सदर रुतीक सुनील सोनवाने याची आत्महत्या नसुन हत्याच असावी असे तर्क वितर्क लावले जात असून पोलीस विभागाच्या तपासात सत्यात समोर येणार आहे. सदर घटनेचा तपास देवरी पोलीस करीत आहेत.

Share