मनोहर भाई पटेल कनिष्ठ महाविद्यालय देवरी चे सुयश

देवरी ◼️ स्थानिक देवरी येथे तालुका क्रीडा संकुल देवरी च्या भव्य क्रीडांगणावर पार पडलेल्या तालुकास्तरीय हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत मनोहर भाई पटेल कनिष्ठ महाविद्यालय देवरी च्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून प्रथम क्रमांक पटकाविला संघाच्या उत्कृष्ट विजयाबद्दल संस्था सचिव रामकुमार गजभिये , प्राचार्य जी एम मेश्राम ,उपमुख्याध्यापक एस टी हलमारे ,पर्यवेक्षक डी. एच .ढवळे ,समस्त प्राध्यापक वृंद,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी विजयी संघाचे अभिनंदन केले व संघाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या विजयी संघाला प्राध्यापक टी आर देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.सदर संघ जिल्हास्तरीय व्हालीबाल स्पर्धेत देवरी तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

सदर विजयी संघात मयूर सलामे ,आदित्य राऊत ,आर्यन उईके तन्मय पुराम ,आर्या गुन्हेवार ,अभय पोले ,प्रतीक नेताम,जतीन लटये ,साहिल बोरकर, महेश पोले ,हर्षद उईके इत्यादी खेळाडूंचा सहभाग होता

Share