गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद उत्सव निमित्त देवरी पोलिसांचे पथसंचलन

देवरी ◼️गोरख भांमरे पोलीस अधिक्षक गोंदिया यांच्या आदेशान्वये नित्यानंद झा अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी व विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे मार्गदर्शनात आगामी गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद उत्सव शांततेत व निर्वीघ्नपणे पार पाडण्यासाठी तसेच सण उत्सव काळात जिल्हयात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी दिनांक ०५/०९/२०२४ रोजी सांयंकाळी १७/०० ते १८/३० वा. दरम्यान पोलीस स्टेशन देवरी येथील देवरी शहरातील मुख्य मार्गाने चिचगड रोड बाजार लाईन, दुर्गाचौक, मस्जित कारगील चौक, गणेश चौक, पंचशिल चौक, मसक-या चौक, बौध्द विहार पर्यंत रुट मार्च पथसंचलन करण्यात आले. सदर पथसंचलन दरम्यान मा. पो. नि. डांगे सा. ठाणेदार देवरी, सपोनि गंगाकाचुर, मपोउपनि. मुळे मँडम श्रेणी पोउपनि मानिक पुरी पोलीस स्टेशन देवरी व १२६ पोलीस अंमलदार, व २७ गृहरक्षक हजर होते.

Print Friendly, PDF & Email
Share