तिकीट न देणाऱ्या 75 एसटी वाहकांवर कारवाई
गोंदिया◾️एसटी महामंडळाच्या बरेच वाहक आर्थिक लोभापोटी प्रवाशांकडून तिकीटाचे पैसे घेत नाही. परिणामी महामंडळाला मोठा फटका बसतो. त्यामुळे महामंडळाकडून अशा वाहकांवर कारवाई करण्यात येते. यातंर्गत मागील सहा महिन्या भंडारा विभागात प्रवाशांकडून पैसे घेऊन तिकीट न देणार्या 75 वाहकांचे प्रकरण सध्या चौकशीत आहे. गत अनेक वर्षांपासून विभागातील काही आगारातील वाहत हे एकाच मार्गावर सेवा देत आहेत. अशा व अन्य मार्गावरील वाहक स्वतःच्या आर्थिक लाभासाठी प्रवाशांकडून तिकीटाचे पैसे घेऊनही तिकीट देत नसल्याच्या अनेक प्रकरण समोर आले आहे. यात महामंडळाचे मोठे नुकसान होत आहे. यावर आळा घालण्याकरिता महामंडळाच्या तपासणी पथकाची नियुक्ती करण्यात आली असून वेळोवेळी धडक कारवाई केली जाते.
तसेच कारवाई करण्यात येते. यातंर्गत भंडारा विभागातंर्गत मागील सहा महिन्यात प्रवाशांकडून पैस घेऊनही तिकीट न देणार्या 75 वाहकांचे प्रकरण चौकशी आहे. यात प्रवाशांकडून पैसे घेऊन तिकीट न देणार्या 25 व तिकीटाही दिले नाही अशा 50 वाहकांच्या प्रकरणचा समावेश आहे. नियमानुसार या वाहकांवर कारवाई केली जात असून तिकीटाच्या रक्कमेसह दंडही वसुली केला जातो. तसेच विनातिकीट प्रवास करणार्या प्रवाशांवर भरारी पथकाद्वरे कारवाई केली जाते. अशा प्रवाशांकडून तिकीटाची रक्कम व दंड वसुली केला जातो. यातंर्गत गत सहा महिन्यात 160 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 8 हजार 888 रुपये प्रवास भाडे व दंड वसूल करण्यात आला आहे.
विनातिकीट प्रवास करणार्या प्रवाशांसह पैसे घेऊन तिकीट न देणार्या, तसेच निष्काळजी करत पैसे व तिकीटही न देणे अशांवर भरारी पथकाची नजर असते. मागील सात महिन्यात अशा 75 वाहकांचे प्रकरण चौकशीत असून 16 प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. शीतल सिरसाड, विभागीय वाहतूक अधिकारी, भंडारा