बारावीच्या परीक्षेत श्रीराम विद्यालयाचा ओजस भैसारे तालुक्यातून प्रथम

देवरी,दि.२१:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने यंदा घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेत स्थानिक श्रीराम कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय चीचगडच्या विद्यार्थ्यानी उत्कृष्ठ यश संपादन केले.
वर्ग १२ वी विज्ञान शाखेत ओजस मधुकर भैसारे ह्याने ६०० पैकी ५२५गुणांसह ८७.५०% गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावले. याशिवाय श्वेता गुनेश शहारे ५११ गुणासह ८५.१७% गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर समीर नूतनलाल याने ५०१ गुणासह ८३.५०% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावले.

वर्ग १२ वी कला शाखेतून कू. ओजस्वी दादाराम डोकरमारे ६०० पैकी ४२४ गुणांसह ७०.६७ % गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक,लक्ष्मी श्रावण मडावी ४१४ गुणासह ६९ % गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर प्रशांत भगतराम सरपा ४०७ गुणासह ६७.८३% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावले. महाविद्यालयात विज्ञान शाखेचा निकाल १००% तर कला शाखेचा निकाल ९७.७२ % लागला आहे.
संस्थेचे अध्यक्ष.आल्हाद जी भांडारकर , प्राचार्य जितेन्द्र रहांगडाले ,पर्यवेक्षक मधुकर जी भैसारे , वीरेंद्र अंजनकर तसेच सर्व कर्मचारी वृंद यांनी प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Print Friendly, PDF & Email
Share