अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर सोबत सविता पुराम यांचे हळदी कुंकू

देवरी⬛️ पंचायत समिती देवरी येथे देवरी तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा वर्कर यांच्यासाठी सविता पुराम महीला व बालकल्याण सभापती गोंदिया यांच्या आयोजनाने हळदी कुंकू व वानाचा कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाला उपस्थित अंबिका बंजार सभापती पंचायत समिती देवरी , कल्पना वालोदे जिल्हा परिषद सदस्य, शामकला गावड पंचायत समिती सदस्य , वैशाली पंधरे , ममता अंबादे ,अंजू बिसेन सरपंच वडेगाव उपस्थित होते. यावेळी सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा वर्कर यांच्या सोबत हळदी कुंकू कार्यक्रम साजरा करण्यात आला.

Print Friendly, PDF & Email
Share