पोलीस विभागातर्फे अतिदुर्गम परिसरातील ९० युवक व नागरिकांना वाहन चालविण्याचा परवाना
गोंदिया◾️पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे मार्गदर्शनाखाली दादालोरा खिडकी योजना एक हात मदतीचा उपक्राअंतर्गत सशस्त्र दूरक्षेत्र मुरकुटडोह अतिदुर्गम परिसरातील युवक व नागरिकांना वाहन चालविण्याचा परवाना तयार करून देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.
छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त मुरकुटडोह परिसराचा विकास करून तेथील स्थानिक नागरिकांना सर्व सुविधा व शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासन सातत्याने प्रयत्न करीत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत मा.पोलीस अधीक्षक, श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक श्री. नित्यानंद झा,यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री. संकेत देवलेकर, यांचे प्रयत्नाने सुरू असलेल्या या नविन्यपूर्ण उपक्रमा अंतर्गत वाहनांच्या वाहतुकीसाठी अत्यावश्यक समजले जाणारे आर.टी.ओ.परवाने व वाहतूक व्यवस्थेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी…. याचा लाभ अतिदुर्गम परिसरतील ग्रामस्थांना मिळावा व उपजीविकेचे साधन निर्माण व्हावे…..या संकल्पनेतुन मुरकुटडोह पोलीस बेस कॅम्पच्या वतीने दादलोरा खिडकी योजना उपक्रमांतर्गत विकासाच्या गतीने मुरकुटडोह परिसरातील तरुणांना पोलीस विभागाने मदतीचा हात पुढे केला आहे…. गोंदिया-छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त मुरकुटडोह परिसराचा विकास करून तेथील स्थानिक नागरिकांना सर्व सुविधा व शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे.
दादालोरा खिडकी योजना एक हात मदतीचा या उपक्राअंतर्गत गोंदिया जिल्हा पोलीसांचे प्रयत्नांतर्गत मुरकुटडोह बेस कॅम्पचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दिनेश बागुल, यांनी मुरकुटडोह गाव व परिसरातील सुमारे 90 तरुणांना वाहतूक प्रशिक्षण देऊन आवश्यक माहिती दिली व आवश्यक कागदपत्रांसह वाहन परवाने तयार करून देण्याकरीता त्या सर्वांची प्रादेशिक परिवहन विभागात ऑनलाईन नोंदणी अर्ज सबमिट करून वाहन चालवायचे परवाने तयार करण्यासाठी परिश्रम घेवून मदत केली आहे….. आज 28 डिसेंबर रोजी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलीस विभागाचे अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुमारे 90 तरुणांना आरटीओ कार्यालय, गोंदिया येथे लर्निंग लायसन्स परवाना प्रदान करण्याचे शिबिर कार्यक्रम घेण्यात आले.
वाहन परवाना तयार करून देताना उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. सुनील ताजने, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री विजय पाटील, मुरकुटडोह पोलिस बेस कॅम्पचे सहायक पोलिस निरीक्षक श्री. दिनेश बागुल, पी.एस.आय. हत्तीमारे (नक्षल सेल), श्री. गजभिये सहायक माहिती अधिकारी, नक्षल सेलचे मार्टिन, स्थानिक गुन्हे शाखेचे चित्तरंजन कोडापे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.