देवरीत विहिरीत पडून तीन वर्षीय बालकाचा मृत्यू

देवरी : देवरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नगरपंचायत देवरीच्या वार्ड क्र. 17 (परसटोलाा)येथे आज 10.00 वाजे दरम्यान घरच्या विहीरीत पडून तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.साहील जितलाल कुंभरे असे त्या मुलाचे नाव आहे.
सविस्तर असे की, नामे जीतलाल कुभरे यांची स्वतःची विहीर घराच्या मागच्या भागात शेती लगत खोदण्यात आली होती. या विहिरीला तोंडी बसविण्यात आली नव्हती. या विहिरीवर इलेक्ट्रिक पोल मांडण्यात आले होते. याच विहिरीवरून घराच्या रोजच्या व्यवहारासाठी पाण्याचा उपयोग केला जात होता.आज साहीलची आजी पाणी भरायला विहिरीवर गेली असता,आजीच्या मागे मागे तीन वर्षीय साहिल सुद्धा गेला. विहिरीवरून आजीचा पाणी भरून झाल्यावर, डोक्यावर पाण्याने भरलेला घगरा घेऊन आजी घरी यायला निघाली. आजीला वाटलं की, साहील मागे मागे घराकडे येत आहे. परंतु, होत्याचे नव्हतं झालं आणि साहील विहिरीवरील ठेवलेल्या खांबावरुन खेळता खेळता विहिरीमध्ये पडला.क्षणातच आरडा ओरड केल्यानंत परिसरातील लोक धावून आले.दोन तासाच्या शोधमोहिमेनंतर साहिलच्या मृतदेह विहिरी बाहेर काढण्यात आला.

Share