संजय पुराम यांच्याहस्ते कुंभारटोला येथे पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे भूमीपूजन

देवरी ◼️तालुक्यातील कुंभारटोला येथे पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे भूमीपूजन संजय पुराम माजी आमदार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी परिसरातील गणमान्य नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाले. ग्राम पंचायत भर्रेगाव अंतर्गत ग्राम कुंभारटोला येथे जल जीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात येणार असून यामुळे गावातील प्रत्येक घराला नळ जोडणी करून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे.

यावेळी संजय पुराम माजी आमदार, संजय उइके नगराध्यक्ष देवरी नगर पंचायत, प्रमोद संगीडवार, सभापती कृ.उ. बाजार समिति देवरी, रितेश अग्रवाल नगर सेवक नगरपंचायत देवरी, यादोवभाऊ पंचमवार माजी नगरसेवक नगर पंचायत देवरी, ग्राम पंचायत भर्रेगाव सरपंच लखनलाल पंधरे, जयेंन्द्र मेंढे उपसरपंच भर्रेगाव व समस्त ग्राम पंचायत सदस्य व गावातील कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share