देवरी 🚨वीज पडून एक महिला जागीच ठार तर दोन जखमी
देवरी ◼️तालुक्यातील ग्रामपंचायत शिलापूर अंतर्गत येत असलेल्या भोयरटोला येथील रहिवासी ललिता कैलास राऊत वय 34 वर्ष शेतात काम करीत असतांना अचानक सुरू झालेल्या विजेच्या कडकडाट मध्ये वीज पडून जागीच ठार झाली. तर गणेशराम पांडुरंग राऊत वय 62 आणि अनुसया गणेशराम राऊत वय 55 हे दोघे जखमी झाले.
भात रोवणीच्या कामाला वेग आलेला असून, सर्व शेतकरी आपापल्या शेतामध्ये भात रोवणीच्या कामांमध्ये व्यस्त आहेत. अशातच, आज दुपारी झालेल्या विजेच्या कडगटासह पावसाला सुरुवात झाली. सविता राऊत ही महिला गावा शेजारील असलेल्या शेतामध्ये भात रोवणीच्या कामाला गेलेली असता, अचानक झालेल्या विजेच्या गडगडामध्ये विज तिच्या अंगावर पडली. आणि महिला जागीच ठार झाली. त्याचप्रमाणे सोबतच भातवणीच्या कामाला असलेले गणेश राम पांडुरंग राऊत आणि अनुसया गणेश राम राऊत हे दोघेही जखमी झाले.या मृत महिलेला एक मुलगा एक मुलगी असून, भोयरटोला गावामध्ये पूर्णतः शोककळा पसरलेली आहे.