सुरतोली माध्यमिक विद्यालयात सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्षारोपण

देवरी ◾️ (प्रहार टाईम्स ) सुरतोली माध्यमिक विद्यालय लोहारा येथे सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्षरोपण कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुभाष दुबे , प्रमुख अतिथी म्हणून कु एस.पी. साखरे वनरक्षक, दलीत टेंभुर्णीकर, अलका दुबे, शहनाज मिर्झा सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी मार्गदर्शन करतांना झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा देश वाचवा, प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाढदिवसानिमित्त एक झाड लावावे व त्याचे मोठे होई पर्यंत संवर्धन केले तर आपले पर्यावरण संतुलित राहणार असे मत व्यक्त केले. विद्यालयाच्या प्रांगणात 30 झाडे लावण्यात आली . कु. साखरे वनरक्षक यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन सहा. शिक्षक सोनग्रे यांनी तर आभारप्रदर्शन सहा. शिक्षक नाईक यांनी केले.

Print Friendly, PDF & Email
Share