विद्युत खांबासह ट्रकची ट्रॅक्टरला धडक

गोंदिया◼️ तिरोडा तालुक्यातील पांजरा येथे रविवार, 28 मे रोजी रात्री 11 ते 11.30 च्या दरम्यान ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याशेजारील विद्युत खांबाला धडकून रस्त्यावरील ट्रक्टरला धडकला. या अपघातात ट्रॅक्टर व वीज विभागाचे नुकसान झाले. तालुक्यातील बोदलकसा येथील खोमेंद्र रहांगडाले यांच्या मालकीचा एमएच 35, जे 7626 क्रमांकाचा ट्रक तुमसर येथून तिरोडा येथे परत येत असताना चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रक रस्त्याशेजारील विद्युत खांबासह रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर आदळला. या अपघातात विद्युत खांबाच्या तारा तुटल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला. तसेच ट्रॅक्टर पलटून मोठे नुकसान झाले. याप्रकरणी तिरोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share