शीख समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

देवरी : गुरुद्वारा गुरू सिंग सभा देवरीच्या वतीने शीख समाजाच्या दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. दहावी बोर्डाच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले सफलदीपसिंग भाटिया ८८.४ टक्के, दीलशित कौर भाटिया ८१.४६ टक्के, अशनित कौर भाटिया ७० टक्के व बारावी बोर्डाच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले एकस दीप कोर भाटिया ८८ टक्के, केसर कौर भाटिया ७४ टक्के, आणि सगल सिंग भाटिया ६१ यांचा स्मृतिचिन्ह देऊन गुरुद्वारा गुरु सिंग सभा येथे सत्कार करण्यात आला.

यावेळी गुरुद्वारा गुरू सिंग सभेचे अध्यक्ष परमजित सिंग भाटिया, सचिव सतविंदर सिंग भाटिया, नगरपंचायत देवरीचे नगरसेवक सरबजित सिंग भाटिया, गुरुद्वाराचे ग्रंथी सतपाल सिंग लकी हे उपस्थित होते. यावेळी नगरसेवक सरबजित सिंग भाटिया म्हणाले की, या कार्यक्रमाचा उद्देश केवळ सन्मान करणे हा नसून गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करणे आहे.

Print Friendly, PDF & Email
Share