वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकने शिक्षिकेस चिरडले, शिक्षिका ठार

Tiroda◼️ वाळू वाहतूक करणाऱ्या भर धाव ट्रकने दुचाकीने जाणाऱ्या शिक्षकेत धडक दिली यात शिक्षिकेचा घटनास्थळी मृत्यू झाला. योगिनी प्रभुराज कुंभलकर ( 52) असे मृतक महिलेचे नाव आहे. ही घटना आज सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास शहरातील शहीद मिश्रा शाळे जवळ घडली. योगिनी त्यांच्या दुचाकी क्रमांक एमएच 35 आर 6118 ने जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या भर धाव ट्रक क्रमांक एमएच 35 एजे 1033 ने धडक दिली. दरम्यान त्या ट्रकच्या मागच्या चाखाखाली आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना होतास त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. योगिनी या तालुक्यातील सरांडी येथील शाळेत शिक्षिका पदावर कार्यरत होत्या. पुढील तपास तिरोडा पोलीस करीत आहेत

Print Friendly, PDF & Email
Share