वैशाली व हेमलता यांची कॉन्स्टेबलपदी निवड
गोंदिया◼️एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत येणार्या देवरी येथील शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृह क्र.2 येथील वैशाली मुलचंद पदे व हेमलता सदाराम पदे या विद्यार्थीनींनी सन 2022-23 या सत्रामध्ये पोलिस कॉन्स्टेबल या पदावर यश संपादन करुन आपल्या आई वडीलांचे स्वप्न पुर्ण केले. या यशाबद्दल प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देवुन त्यांचा गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे या दोघी एकाच कुटुंबातील बहिणी (चुलत) आहेत.
नक्षलग्रस्त व दुर्गम क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील देवरी प्रकल्पातील चुंभली या आदिवासीबहूल ग्रामीण भागातील या दोघी एकाच कुटुंबातील बहिनींनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीत अभ्यास करून आपल्या प्रतिभेची चुणूक दाखविली. त्यांना प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार याच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षेचे विविध पुस्तके उपलब्ध करुन देवुन विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. दरम्यान राचेलवार यांनी याच पदावर न थांबता वरिष्ठ पदावर जाण्यासाठी प्रयत्न करावे अशा शुभेच्छा राचेलवार यांनी दिल्या. या विद्यार्थिनींनी आपल्या यशाचे श्रेय प्रकल्प अधिकारी राचेलवार, गृहपाल एस. एल. देवगडे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी एच. आर. सरीयाम, अरुण सुर्यवंशी व आईवडीलांना दिले आहे.