एक्वा वॉटर पार्कमध्ये तरुणाला बेदम मारहाण

गोंदिया: सडक अर्जुनी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या डुग्गीपार पोलीस स्टेशनजवळी नयनपूर येथील एक्वा ॲडव्हान्चर वॉटर पार्कमध्ये जलतरण तलावात बॉल पासिंग खेळत असताना झालेल्या किरकोळ वादातून बाचाबाची नंतर एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेतील गंभीर तरुण पंकज नुतेंद्र बिसेन (२४) रा. कुडवा, गोंदिया याला उपचाराकरिता गोंदिया येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यावर रविवारी मध्यरात्री तीन शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती डूग्गीपर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिंगणजुडे यांनी दिली. डूग्गीपर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सडक अर्जुनी येथील वॉटर पार्क मध्ये तुमसर आणि गोंदियातील कुड़वा येथील तरुणांचे वेग वेगळे गट मौज मस्ती करण्याकरिता गेले होते.
दरम्यान स्विमिंग पूल मध्ये बॉल पासिंग खेळत असताना त्यांच्यात किरकोळ वाद झाला, बाचाबाची नंतर सदर तरुण पळून जाण्याच्या बेतात असताना तुमसरच्या तरुणांनी त्याला कार पार्किंग परिसरात बेदम मारहाण केली. यात तो जागीच बेशुद्ध पडला त्याला त्याच्या मित्रांनी उपचाराकरिता गोंदियातील खाजगी रुग्णालयात दाखल केले.या प्रकरणी रविवारी रात्रीच मॉन्टी ओमप्रकाश जैसवाल (३०), प्रभाकर कान्हा गुर्वे (३९) ,भूषण रमेश बिसेन (२७),जीवन गोविंदा डहाके (४४) सर्व रा. तुमसर जि.भंडारा यांना डूग्गीपार पोलिसांनी अटक केली आहे. गंभीर जखमींचा लहान भाऊ फिर्यादी प्रतीक नुतेंद्र बिसेन (२३) याच्या तक्रारी वरुन डूग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जनार्दन हेगडकर करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share