देवरी: मोटारसायकल अपघातात २ मृत १ गंभीर

देवरी ◼️ चिचगड रोडवरील भाटीया पेट्रोल पंप समोर दुचाकीची-दुचाकीला झालेल्या अमोरा समोरील दिलेल्या धडकेत एकाचा जागीच तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि.25/04/2023 रोज मंगळवारच्या रात्री 8.30 वाजता दरम्यान घडली. या अपघातात हितेश श्रीवास व मिरजा बेग यांचा मृत्यू झाला.

हितेश संतोष श्रीवास वय – 25 राहणार (परसटोला) देवरी हा मोटरसायकल ने मार्केट कडे येत असतानीं समोरुन येत असलेली मोटारसायकल चालक मिरजा अलिम बेग वय – 35 राहनार बालाघाट या दोघाचां आप आपल्या दुचाकी वरील संतुलन सुटल्याने यानीं येक मेकांच्या मोटारसायकला जबर धडक दिली. ज्यात हितेश श्रीवास याचा घटना स्थळीच म्रुत्यु झाला तर मिरजा अलिम बेग याचा उपचारा दरम्यान म्रुत्यु झाला. व सोबत मोटार सायकल वर बसलेली मिरजा बेग याची पत्नीं शाहिल मिर्जा बेग ही गंभीर जखमी झाली. यानां प्राथमीक उपचाराकरीता देवरी ग्रामीन रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच देवरी पोलिस घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा करीत मृतकांना शवविच्छेदना करीता पाठविण्यात आले आहे. सदर घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Print Friendly, PDF & Email
Share