सूर्याभोवतीच्या रिंगणाने देवरीकरांना आश्चर्याचा धक्का!

◼️हजारो लोकांच्या व्हॉट्सऍप वर आज सूर्यभोवतीच्या रिंगणाचे वीडियो आणि फोटोस

देवरी ◼️ तालुक्यात आज सकाळी १०:४० च्या सुमारास आकाशात सूर्या भोवती रिंगण असलेले दिसले. सदर देखाव्यामुळे नागरिकांना चक्क आश्चर्याचा धक्काच बसला असून उत्सुक नागरिकांनी या देखाव्याला आपल्या मोबाईलच्या कैमरामधे टिपण्याचा मोह आवरता आला नाही.

सदर देखावा अर्धातासाहून काळापर्यंत आकाशात मनमोहक स्वरुपात दिसत होता यावेळी आकाशाकडे बघण्याऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात होती.

Print Friendly, PDF & Email
Share